राजकीय

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवरुन अनिल परब यांचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "सरकार वाचवण्यासाठीच..."

नवशक्ती Web Desk

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारपासून सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला आहे, आता फक्त सुनावणीसाठी अध्यक्षांकडे पाठवला पाठवला असून लवकरच याचा निकाल लागले असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं. हे १६ आमदार अपात्र ठरणार असून सरकार वाचवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, असं देखील परब म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज पंढरपूरला दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद सांधताना याबाबतचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून पूर्णपणे अर्थ लावूनच पाठवले आहेत. आता फक्त निर्णय घेणं बाकी आहे. हे सरकार सध्या वेळ काढण्याचा प्रयत्न करील असले तरी तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यापालांची भूमिका, घटनेतील १० वेक कलम या सर्व बाबी सांगितल्या असल्याने पक्षांतर्गत बंदी बाबत असलेले सर्व नियम स्पष्ट आहेत. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी वेळकाढू पणा सुरु असून १६ आमदार अपात्र होणे म्हणजे सरकार जाणे आहे. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री असून यापाठोपाठ इतर २३ आमदारांचे पिटिशन देखील बाकी असल्याने हा वेळकाढूपणा सध्या सुरु आहे. असं देखील अनिल परब म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला असावा. राष्ट्रवादीनेही आमच्याप्रमाणेच अपात्रतेची कारवाई सुरु केली असल्याने परब यांनी सांगितलं. सध्या उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याच्या त्याच्या लायकी प्रमाणे टीका सुरु असून असं बोलल्यानेच त्यांचं त्यांच्या पक्षातील स्थान असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश