राजकीय

सर्व काही सहजासहजी कसं होईल? काही गोष्टी होतच असतात, ईडी चौकशीसाठी जाण्यापुर्वी जयंत पाटील यांचं विधान

मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देईल. चिंता करण्याचे काही कारण नाही, असा विश्वास त्यांनी समर्थकांना दिला आहे.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यासाठी पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीमार्फत त्यांची चौकशी सुरु असल्याचे ईडीच्या कार्यलायाबाहेरत मोठ्या संख्यनेत जयंत पाटील यांचे समर्थक तसेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले आहेत. तसेच पाटील यांच्या निवासस्थानी देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी जमलेल्या कार्यरकर्त्यांनी मोठ्याने ईडी विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. ईडी सुडबुद्दीने कारवाई करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे.

ईडीच्या कार्यलयात दाखल होण्यापुर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही लोकांना वेगवेगळ्या टोलनाक्यावर थांबवले असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी शांत रहा. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देईल. चिंता करण्याचे काही कारण नाही, असा विश्वास त्यांनी समर्थकांना दिला आहे. यावेळी त्यांनी आपण विरोधी पक्षात आहोत तर काही गोष्टी या सोसाव्याच लागणार ना. सर्वकाही सहजासहजी कस होईल? असे म्हणत काही गोष्टी या होतच असतात. त्यांना तोंड द्यायचे असते, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

मुंबईला न येण्याचे आवाहन

जयंत पाटील आज चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यलयात हजर राहणार असल्याने त्यांनी ट्विट करुन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी 11 वाजत मी चौकशीसाठी ईडी कार्यलयात उपस्थिर राहणार आहे. मला ईडीचे समन्स आल्यापासून राज्यभरातील माझ्या पक्षातील आणि इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोत येत आहे. राज्यभतातून लोक ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. कोणीही मुंबईलला येऊ नये, अशी माझी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विनंती आहे. मी या चौकशीत ईडीला पुर्णपणे सहकार्य करणार आहे. आपण सर्वांनी जे प्रेम दाखवले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांची ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी

जयंत पाटील आज मुंबई येथील ईडी च्या चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी हजारोच्या संख्येने त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. यात मोठ्या संख्येने वारकऱ्यांचाही समावेश होता. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यलयाबाहेर जमत जोरदार घोषणाबाजी केली. ईडी सुडबुद्दीने कारवाई करत असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिक्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली