(संग्रहित छायाचित्र)
राजकीय

अजित पवारांच्या बैठकीला पाच आमदारांची दांडी

लोकसभेतील दारुण पराभवानंतर कारणमीमांसा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली.

Swapnil S

मुंबई : लोकसभेतील दारुण पराभवानंतर कारणमीमांसा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. त्यानंतर कोअर कमिटीची बैठक अजित पवारांनी घेतली. दरम्यान, पाच आमदारांच्या अनुपस्थितीमुळे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी, १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या केलेल्या वक्तव्याला पुष्टी मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जे यश मिळविले, त्यातही शरद पवार गटाने राज्यात १० जागा लढविल्या आणि ८ जागा निवडून आणल्या. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता होती. त्यामुळे अजित पवार हे एनडीएच्या दिल्लीतील बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या आमदारांची बैठक गुरुवारी मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. या बैठकीच्या आधीच शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या बैठकीच्या आधी अजित पवार यांनी कोअर कमिटीशी चर्चा केली. राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात अजित पवार गटाचे अनेक आमदार स्वगृही परततील, अशी शक्यता आहे.

मी जास्त वेळ अंधारात ठेवणार नाही - जयंत पाटील

यासंदर्भात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, रोहित पवारांच्या संपर्कात आमदार असू शकतील. याविषयी मला लगेच बोलता येणार नाही. पण मी जास्त वेळ तुम्हाला अंधारात ठेवणार नाही, असेही ते म्हणाले.

एनडीएच्या खासदारांची आज बैठक

नेते मोदी यांच्यासमवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यास जाणार असून त्यांना खासदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करणार आहेत.

मोदी येत्या रविवारी म्हणजे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चा केली. घटक पक्षातील कोणाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावयचा, भाजपमधील कोणला संधी द्यावयाची यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले