राजकीय

"ते स्टॅलिन यांचं वयक्तीक मत असू शकतं", सनातन धर्माविषयीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नवशक्ती Web Desk

देशात सनातन धर्माबाबतचा वाद वाढतच चालला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात मोठा वाद रंगला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सगळीकडे पाहायला मिळत असून त्यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. आता सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

स्ट्रलिन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मी ते विधान ऐकलं आहे. राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांची विधाने देखील मी चांगलीच ऐकली आहेत. उदयनिधी स्टॅलिन हे एक मंत्री आहेत आणि त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही. तुम्ही इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष आहात त्यामुळे अशी विधाने करणे तुम्ही टाळली पाहिजेत. हे डीएमकेचं मत असू शकतं किंवा त्यांचं स्वत:चं मत असू शकतं. या देशात सुमारे ९० कोटी हिंदू लोकं राहतात आणि त्याच बरोबर इतर धर्माचे लोकही या देशात राहतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासगळ्यामुळे देशाचे वातावरण अधिक बिघडलं आहे, तुमचं वैयक्तित मत तुमच्यापुरतं ठेवा. भाजपला असं कुठलं शस्त्र मिळालं नाही पाहिजे जेणेकरून ते शस्त्र वापरून ते आपल्यावरचं हल्ला करत राहतील. आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. एमके स्टॅलिन हे एक मोठे नेते आहेत, ते आमच्यासोबत आता युद्धात उतरले आहेत. स्टॅलिन यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी थोडं सांभाळून बोलावं, जेणे करून इंडिया आघाडीसमोर कुठली अडचण येणार नाही", असं संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमके पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना अशा आजारांशी केली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.यावरून भाजपकडून उदयनिधी यांच्यासह इंडिया आघाडीवर देखील टीका करण्यात येत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त