राजकीय

Nawab Malik: नवाब मलिक अजित पवार गटात! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले

त्यामुळे आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवशक्ती Web Desk

राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून आज नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चांगलाच बंदोबस्त केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले होते. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चांगलच चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे नक्की कोणत्या गटात सहभागी होणार याबद्दल कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहेत. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.

नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर बाहेर आले होते. पण मलिक नक्की शरद पवार गटात जाणार की अजित पवार गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा झाली होती. मात्र, यावेळी मलिक यांनी कोणतेही भूमिका न घेता तटस्थ राहणे पसंद केले आहे. त्यामुळे नवाब मलिक नक्की कोणत्या गटात सहभागी होणार यावरून वेगवेगळ्या चर्चा झाल्या. पण आता नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक