राजकीय

"...तर याची किंमत मोजावी लागणार!", ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांना थेट इशारा

नवशक्ती Web Desk

आमदार अपात्रे प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. अशात आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुचक इशारा दिला आहे.

संजय राऊत राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल. आज तुम्ही उल्लंघन केलं आहे. पण भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. असं संजय राऊत म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत. त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले आहेत. हे मान्य आहे. पण शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल. आज तुम्ही उल्लंघन केलं आहे. मात्र, भविष्यात सरकार बदलतात आणि तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे, असा थेट इशारा संजय राऊत यांनी नार्वेकरांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या, झाडून घेतल्या स्वतःवर गोळ्या

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू