राजकीय

"...ही तर सर्वात मोठी अंधश्रद्धा", सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका

भिवंडीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

नवशक्ती Web Desk

सुषमा अंधारे या आपल्या आकर्षक भाषण शैलीमुळे ओळखल्या जातात. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी झंजावातात ठाकरे गटाची बाजू लावून धरली आहे. सुषमा अंधारे आपल्या आक्रमक शैलीत अनेक भाजप नेत्यांना धारेवर धरतात. आता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत या अंधश्रद्धा आहे. अशी टिका अंधारे यांनी केली आहे. भाजपचे अनुसुचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेनेत (ठाकेर गट) प्रवेश केला. यानंतर संध्याकाळी भिवंडी ग्रामीणमध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी सुषमा अंधारे यांच्याकडून भाजप आणि शिंदे गटावर खोचक टीका केली.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत. मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही कोणाला घडवलं तर उत्तर मिळतं कुणालाच नाही. फडणवीस यांनी माणसं घडवली नसून त्यांनी इकडून तिकडून सगळी भाड्याची माणसं गोळा केली आहेत.

त्या म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी माणसं घडवली. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून भाड्याने माणसं गोळा केली आहेत. देवेंद्र फडणवीस जुगाड करण्यात पटाईत आहेत. माणसं घडवण्यात नाही. त्यांनी माणसं घडवली नाही तर संपवली. त्यांनी विनोद तावडे यांना संपवलं, पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, एकनाथ खडसेंना त्रास दिला, असे आरोप यावेळी अंधारे यांनी केले. बाहेरुन घेतले होते अशांबरोबर त्यांनी काय न्याय केला? विनायक मेटेंना काय न्याय मिळाला? सदाभाऊ खोत राजू शेट्टींबरोबर का दिसत नाहीत? याचा विचार करा.. असंही त्या म्हणाल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी