क्रीडा

बांगलादेशने श्रीलंकेला ४ गडी, ५८ चेंडू राखून चारली धूळ; एकदिवसीय मालिकाही खिशात

Swapnil S

चट्टोग्राम : कन्कशन (बदली खेळाडू) म्हणून आलेल्या तांजिद हसनने (८१ चेंडूंत ८४ धावा) साकारलेल्या अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला ४ गडी आणि ५८ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह बांगलादेशने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ५० षटकांत २३५ धावांत गारद झाला. तस्किन अहमदने ३, तर मुस्तफिझूर रहमान व मेहदी हसन मिराजने प्रत्येकी दोन बळी मिळवले. जनिथ लियांगेने १०२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०१ धावांची दमदार खेळी साकारली. रहमान जायबंदी झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. तसेच सौम्य सरकारला डोक्याला दुखापत झाल्याने हसन मैदानावर आला.

त्यानंतर हसनच्या अर्धशतकाला रिशाद होसेन (१८ चेंडूंत नाबाद ४८) आणि मुशफिकूर रहिम (नाबाद ३७) यांच्या योगदानाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे बांगलादेशने २३६ धावांचे लक्ष्य ४०.२ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. रिशाद होसेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकेत सर्वाधिक १६३ धावा करणारा नजमूल होसेन शांतो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. जेतेपदाचा चषक स्वीकारल्यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी टाईम-आऊटची नकल करून श्रीलंकेला टोला लगावला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त