क्रीडा

महाराष्ट्राचा झैद अहमद चॅलेंजर्स ट्रॉफीचा विजेता; कर्नाटकचा झहीर पाशा अंतिम फेरीत पराभूत

विजेत्या झैदला १ लाख ५० हजारांचे तर उपविजेत्या झहीर पाशाला १ लाखाचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या झैद अहमदने कर्नाटकच्या झहीर पाशाला पराभूत करून विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या प्रशांत मोरे याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.

अंतिम फेरीतील पहिल्या सेटमध्ये प्रेक्षकांनी या चॅलेंजचा खरा थरार अनुभवला. पहिल्या सेटमध्ये सहावा आणि अंतिम बोर्ड संपल्यावर दोन्ही खेळाडूंचे १६-१६ असे सामान गुण झाले होते. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये दोन्ही खेळाडूंना राणी पॉकेटमध्ये घेण्यासाठी प्रत्येकी तीन डाव देण्यात आले होते. यामध्ये झैदने सलग दोन वेळा राणी काबीज केली. तर झहीरचे दोन्ही डाव वाया गेले. यामुळे पहिला सेट झैदने जिंकून स्पर्धेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा सेट झैदने २०-११ अशा फरकाने जिंकून महाराष्ट्र ओपन चॅलेंजर्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

विजेत्या झैदला १ लाख ५० हजारांचे तर उपविजेत्या झहीर पाशाला १ लाखाचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. मात्र झहीर पाशाने आपली १ लाखांची बक्षिसाची रक्कम उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या विदर्भाच्या इर्शाद अहमदला देत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत माजी विश्वविजेत्या महाराष्ट्राच्या प्रशांत मोरेने महाराष्ट्राच्याच योगेश धोंगडेंवर २४-९, १८-८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून तिसऱ्या क्रमांकाचे ७५ हजारांचे इनाम पटकाविले. तर योगेशने ५० हजारांची कमाई केली. उपउपांत्य फेरीतील खेळाडूंना प्रत्येकी २५ हजारांचे ईनाम देण्यात आले होते.

उपांत्य फेरीच्या सामन्यात झहीरने योगेश धोंगडेंवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-२, ७-२०, २३-५ अशी मात केली होती. तर झैदने प्रशांत मोरेला २२-४, १०-७ असे पराभूत केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंचे या खेळातील वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी