क्रीडा

दुबे आणि गोलंदाजांमुळे चेन्नईचा दुसरा विजय!

Swapnil S

चेन्नई : मुंबईकर डावखुरा फलंदाज शिवम दुबेने (२३ चेंडूंत ५१ धावा) साकारलेल्या घणाघाती अर्धशतकाला गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला ६३ धावांनी नेस्तनाबूत केले. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर गुजरातला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकातं ६ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या सलामीवीरांनी ३२ चेंडूंतच ६२ धावांची सलामी नोंदवली. रवींद्रने ६ चौकार व ३ षटकारांसह २० चेंडूंतच ४६ धावा फटकावल्या. रशिद खानने त्याला बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे (१२), ऋतुराज (४६) काही षटकांच्या अंतरात बाद झाले. मात्र ३० वर्षीय दुबेने आयपीएल कारकीर्दीतील सातवे अर्धशतक साकारून चेन्नईला २०० धावांपलीकडे नेले. दुबेने २ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर समीर रिझवी (६ चेंडूंत १४) व डॅरेल मिचेल (नाबाद २४) यांनीही उपयुक्त योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला २० षटकांत ८ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली. साई सुदर्शनने ३७ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र कर्णधार शुभमन गिल (८), डेव्हिड मिलर (२१), राहुल तेवतिया (६) यांनी निराशा केली. चेन्नईकडून दीपक चहर, मुस्तफिझूर रहमान आणि तुषार देशपांडे या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

हसी आणि धोनीमुळे खेळात सुधारणा

दुबेने चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना फलंदाजीतील सुधारणेचे श्रेय दिले. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतसुद्धा दुबेने दमदार फलंदाजी केली होती. “बाऊन्सरवर पूर्वी मी चाचपडायचो. आता मात्र माझ्या खेळात सुधारणा झाली असून मी शॉट खेळताना घाबरत नाही. त्याशिवाय फिरकीपटूंनी मी अधिक आत्मविश्वासाने सामोरा जातो. धोनी व हसी यांनी माझी सातत्याने पाठराखण केली आहे. त्यामुळेच माझी फलंदाजी बहरली आहे,” असे दुबे म्हणाला.

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

Mumbai Airport: आज ६ तासांसाठी बंद राहणार मुंबई एअरपोर्ट, टेकऑफ नाही करणार कोणतेच विमान!

"श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींची विखारी टीका

Madhya Pradesh: आठवीतील विद्यार्थिनी गरोदर, चुलत भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

वादाच्या भोवऱ्यात रुग्णवाहिका खरेदी निविदा; उच्च न्यायालयाने घेतली दखल, सुमोटो याचिका करून घेतली दाखल