सोने पे सुहागा! बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जास्मिन लंबोरियाला सुवर्णपदके; जादुमणी सिंहला रौप्यपदकावर समाधान जाटमणी अंतिम 
क्रीडा

सोने पे सुहागा! बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जास्मिन लंबोरियाला सुवर्णपदके; जादुमणी सिंहला रौप्यपदकावर समाधान जाटमणी अंतिम

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील बॉक्सिंगच्या रिंगमध्ये शनिवारी भारतीय मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी केली. महिलांच्या विभागात प्रीती पवार आणि जास्मिन लंबोरिया यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांच्या ५५ किलो वजन गटात जादुमणी सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Swapnil S

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील बॉक्सिंगच्या रिंगमध्ये शनिवारी भारतीय मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी केली. महिलांच्या विभागात प्रीती पवार आणि जास्मिन लंबोरिया यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांच्या ५५ किलो वजन गटात जादुमणी सिंहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या ५४ किलो वजन गटात २२ वर्षीय प्रीती पवारने भारताला शनिवारच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्कार्लेट डेलगाडोचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रीतीने पहिल्या फेरीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले. यापूर्वी उपांत्य फेरीत प्रीतीने झाम्बियाच्या कॅथरीन म्वापाचा ५-० असा पराभव केला होता.

त्यापाठोपाठ ५७ किलो वजन गटात विद्यमान जागतिक विजेत्या जास्मिन लंबोरियाने उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्श हिचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. अटीतटीच्या पहिल्या फेरीत २-३ अशा स्प्लिट व्हर्डिक्टनंतर जास्मिनने दुसऱ्या फेरीत दमदार पुनरागमन करत जोरदार प्रहार केले आणि एकमताने विजय मिळवला.

जादुमणी अंतिम फेरीत पराभूत

पुरुषांच्या ५५ किलो वजन गटाच्या अंतिम सामन्यात जादुमणी सिंहला ऑस्ट्रेलियाच्या जॉय डिक्सनकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उंचीचा फायदा असलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सुरुवातीला जादुमणीला काहीसा संघर्ष करावा लागला. तरीही त्याने पहिली फेरी ३-२ अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत डिक्सनने शानदार पुनरागमन करत सर्व पंचांची मते आपल्या बाजूने खेचली आणि ५-० अशा एकमताने फेरी जिंकली. त्यानंतर मिळालेल्या आघाडीचा फायदा घेत त्याने सामना आपल्या नावावर केला आणि भारतीय बॉक्सर्सची सुवर्णपदकांची मालिकाही खंडित केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार