क्रीडा

टीम इंडियाला दिलासा,रोहित शर्माची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह

इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत तो खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे

वृत्तसंस्था

रोहित शर्माच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत तो खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोहितला इंग्‍लंडविरुद्धच्‍या पाचव्या पाचव्या पुनर्नियोजित कसोटीतू सामन्याला मुकावे लागले आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

बीसीसीआयने याआधीच टी-२० आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. रोहित आता इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग बनणार आहे. आयपीएल २०२२ पासून रोहित आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

सूत्रांनी माहिती दिली की, रोहितचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याने सामन्यातून बाहेर पडला. संघातील इतर खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पाचवी कसोटी ५ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह पाच वरिष्ठ खेळाडूंना टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाला इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊ इच्छित आहेत, असे सांगण्यात येते. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत