संग्रहित फोटो  
क्रीडा

Paris Olympics 2024 : १६ वर्षांत पहिल्यांदाच निराशाजनक कामगिरी, ऑलिम्पिकमध्ये भारताची घसरण

भारताला केवळ सहा पदकांसह ७१व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने यावेळी ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसवारीसाठी पाठवले होते.

Swapnil S

टोकियो ऑलिम्पिकमधील सात पदकांच्या विक्रमी कामगिरीनंतर भारताने पॅरिसमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठण्याचे ध्येय बाळगले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. भारताला केवळ सहा पदकांसह ७१व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने यावेळी ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसवारीसाठी पाठवले होते.

भारताकडून नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात रौप्य, नेमबाजीत मनू भाकरने वैयक्तिकसह सरबज्योत सिंगच्या साथीने मिश्र दुहेरीत अशी दोन कांस्यपदके जिंकली. त्याशिवाय पुरुषांचा हॉकी संघ, नेमबाज स्वप्निल कुसळे आणि कुस्तीपटू अमन सेहरावत यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली. मात्र गेल्या १६ वर्षांत म्हणजेच ५ ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताची यावेळी क्रमवारीत घसरण झाली. यापूर्वी १९९६ व २०००च्या ऑलिम्पिकमध्येही भारताला ७१व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

भारताची २०३६ साठी दावेदारी

१९२४नंतर यंदा प्रथमच पॅरिसला ऑलिम्पिकच्या आयोजनाचा मान मिळाला होता. आता २०२८मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेल्स येथे पुढील ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. १९३२ आणि १९८४ नंतर तिसऱ्यांदा लॉस एंजेल्स येथे ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल. २०३२मध्ये ब्रिस्बेन येथे ऑलिम्पिक होईल. २०३६चा आयोजक कोण, हे अद्याप ठरलेले नसून भारत यासाठी दावेदारी सादर करणार आहे. त्यामुळे हा मान भारताला मिळाल्यास देशातील क्रीडा क्षेत्राला आणखी चालना मिळेल.

नीरज भारताऐवजी जर्मनीला रवाना

भारताचा रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी मायदेशी परतण्याऐवजी जर्मनीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नीरज पुढील एक महिना भारतात परतणे अपेक्षित नाही. तो लवकरच शस्त्रक्रिया करण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर डायमंड लीगच्या उर्वरित स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याविषयी तो निर्णय घेईल.

Maharashtra assembly elections 2024: मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांची आश्वासने

Maharashtra assembly elections 2024 : चेंबूरमध्ये दोन मित्रांत लढत! शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना

मुख्यमंत्र्यांचे समोसे कुणी केले फस्त? सीआयडी चौकशी सुरू

पालिकेला नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश; दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक