ANI
क्रीडा

IND vs ENG Test : इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय ; मालिका बरोबरीत

दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांना काही विशेष करता आले नाही. सर्व फलंदाज स्वस्तात माघारी

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या 378 धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी झंझावाती शतके झळकावत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली होती, इंग्लंडने हा सामना जिंकल्याने मालिका बरोबरीत राहिली.

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली पण अर्धा संघ बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा करत भारताला 416 धावांत गुंडाळले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, पण जॉनी बेअरस्टोचे (104) शतक संघासाठी महत्त्वाचे ठरले. मात्र, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या बळावर इंग्लंडचा डाव 61.1 षटकांत 284 धावांत आटोपला. दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांना काही विशेष करता आले नाही. सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र पुजारा आणि पंत यांची अर्धशतके संघासाठी महत्त्वाची ठरली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत