क्रीडा

दुबई-शारजामध्ये उत्सवी वातावरण; भारत-पाकचे खाद्यपदार्थ एकाच थाळीत मिळणार

वृत्तसंस्था

आशिया चषक क्रिकेट स्पधेत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात बहुप्रतीक्षित क्रिकेट सामना होत असल्याने काही हॉटेल्सनी खास आशिया चषकासाठी खाद्यपदार्थ नव्याने बनविले आहेत; तर काही हॉटेलमध्ये देशांचे खाद्यपदार्थ एकाच थाळीत मिळणार आहेत. दुबई-शारजामध्ये अक्षरश: उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

या सामन्याच्या सर्व २५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. मोठ्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी पाहुणे आले आहेत. दुबई आणि शारजाहमधील हॉटेल्स खचाखच भरली आहेत. बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत.

दुबईतील रेस्टॉरंट्सकहून गीत-संगीतासोबत भोजनाचा आस्वाद घेत सामने पाहण्यासाठी अनेक ऑफर दिल्या जात आहेत. दुबईत शुक्रवारी दुपारी १२ पासून ते रविवारपर्यंत सुट्टी असल्याने कार्यालये बंद असतात. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हा महामुकाबला पाहण्यासाठी रविवारी बार आणि रेस्टॉरंट बुक केली आहेत.

अनेक ठिकाणी ढोल-ताशांची व्यवस्था आहे. दुबईत अक्षरश: उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. आशिया चषक स्पर्धेतील १३ पैकी नऊ सामने येथे खेळवले जाणार आहेत.

१६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्याने झाली; पण खरी उत्सुकता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची आहे.

शारजाच्या ‘किंग-हाऊस ऑफ मुघलाई फूड’चे मालक अदीब अहमद यांनी सांगितले की, “आम्ही खास सामन्याच्या दिवसासाठी आशिया चषकाच्या नावाने खाद्यपर्थांची रचना केली आहे. त्यात एकाच थाळीत भारतीय आणि पाकिस्तानी खाद्यपदार्थांचे मिश्रण असणार आहे. लखनवी कबाब, पाकिस्तानी खीर, पेशावरी चिकन, मलबार पराठ्यांसोबत शाकाहारी पदार्थ असतील.”

दोन्ही देशांच्या संगीताचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईच्या ‘हाय नोट पूल’ आणि ‘स्काय लाउंज’वर मोठ्या स्क्रीनवर भारत-पाक सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हाय नोटचे सीईओ हरी केमल म्हणाले की, “आम्ही नोंदणीनुसार स्क्रीनची संख्या वाढविणार आहोत. एका म्युझिक लाउंजने सामन्यादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी संगीताची व्यवस्था केली आहे.”

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी