क्रीडा

अखेर श्रीलंकेचे स्वप्न साकार

ऋषिकेश बामणे

२००७चा एकदिवसीय विश्वचषक, २००८चा ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१२चा पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक. अशा एकूण चार आयसीसी स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या श्रीलंका संघाने अखेर २०१४ मध्ये विश्वविजेतेपदाचा वेध साधला.

बांगलादेश येथे १६ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत झालेल्या या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी श्रीलंकेने आशिया चषकसुद्धा जिंकण्याची किमया साधली. त्यामुळे त्यांना जेतेपदासाठी नक्कीच प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्यासह भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे संघही शर्यतीत होते. मात्र श्रीलंकेने दमदार प्रारंभ करताना सुपर-१० मधील पहिल्या गटात अग्रस्थान मिळवले. त्यांनी अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स व न्यूझीलंड या संघांना पराभूत केले. इंग्लंडविरुद्ध त्यांनी एकमेव पराभव स्वीकारला. मात्र सरस धावगतीच्या बळावर श्रीलंकेने दिमाखात उपांत्य फेरी गाठली. तेथे त्यांच्यापुढे वेस्ट इंडिजचे कडवे आव्हान होते. २०१२ मध्ये अंतिम फेरीत विंडीजने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत नमवून विश्वचषक उंचावला होता. यावेळी मात्र श्रीलंकेने पराभवाची सव्याज परतफेड करताना २७ धावांनी विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

श्रीलंकेच्या मार्गात यावेळी बलाढ्य भारताचा अडथळा होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने त्या विश्वचषकात एकही लढत न गमावता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु लसिथ मलिगांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने कुमार संगकारा, महेला जयवर्धने या अनुभवी खेळाडूंना जेतेपदासह निरोप देण्याचे जणू मनावर घेतले होते. अंतिम फेरीत भारतीय फलंदाजांना फक्त १३० धावांत रोखून संगकाराच्याच दमदार नाबाद अर्धशतकामुळे श्रीलंकेने १८ व्या षटकात सहा गडी राखून विजय मिळवला आणि त्यांचे जेतेपदाचे स्वप्न साकार झाले.

आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी फक्त पाच दिवस शिल्लक असताना सध्याचा श्रीलंका संघसुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. सप्टेंबर महिन्यात आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेला यावेळी पात्रता फेरीचा अडथळा ओलांडावा लागणार आहे.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर