क्रीडा

पहिला अर्जुन पुरस्कार पटकावणारे देशाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी गुजरातच्या जामनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी

भारतीय माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे आज वयाच्या ८८व्या वर्षी गुजरातच्या जामनगर येथे निधन झाले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, ते अर्जुन पुरस्कार पटकावणारी पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले होते. अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या सलीम दुर्राणी यांनी भारतीय क्रिकेटसाठी आपले आयुष्य दिले होते. भारतीय संघाकडून खेळताना त्यांनी २९ कसोटी सामन्यांमध्ये १२०२ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार लागवण्याचे त्यांचे वैशिष्ठ होते.

११ डिसेंबर १९३४मध्ये अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू सलीम दुर्रानी हे ८ महिन्यांचे असताना दुर्रानी कुटुंबासहित पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थायिक झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दुर्रानी कुटुंब भारतामध्ये आले. त्यानंतर क्रिकेटमध्ये रस निर्माण झालेल्या सलीम यांनी १ जानेवारी १९६०ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाचे तब्बल १३ वर्ष प्रतिनिधित्व केले. १९६०मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले.

आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सलीम दुर्रानी यांनी २५.०४च्या सरासरीने २९ कसोटींमध्ये १२०२ धाव केल्या आहेत. यामध्ये त्यांनी १ शतक आणि ७ अर्धशतके लगावली आहेत. त्यांनी ६ फेब्रुवारी १९७३ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला होता. याशिवाय त्यांनी चित्रपटामध्येही काम केले आहे. त्यांनी १९७३मध्ये 'चरित्र' या चित्रपटात काम केले. तसेच, २०११मध्ये त्यांना बीसीसीआयकडून 'सीके नायडू जीवनगौरव' पुरस्कारही देण्यात आला. त्यांच्या निधनाने क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप