क्रीडा

WPL Auction 2023 : मुंबई इंडियन्सच्या संघात आली भारताची कर्णधार; मोजले इतके कोटी

प्रतिनिधी

महिला प्रीमियर लीग २०२३च्या (WPL Auction 2023) लिलावाला सुरुवात झाल्यानंतर भारताची कर्णधार हरामनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) कोणत्या संघाकडे जाते? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. अखेर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तिच्यावर तब्बल १ कोटी ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ठ करून घेतले. त्यामुळे आता आगामी महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची धुरा तिच्या दिली जाऊ शकते.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहेत. तिच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. त्यामुळे फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक महिला क्रिकेटमध्ये तिच्या नावाची चर्चा होते. तिने आत्तापर्यंत १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून २,९५६ धाव केल्या आहेत. ज्यामध्ये ९ अर्धशतके आणि एकाच शतकाचा समावेश आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा