क्रीडा

हैदराबादची गोव्यावर ३७ धावांनी मात; अर्जुन तेंडुलकरची प्रभावी गोलंदाजी व्यर्थ

वृत्तसंस्था

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत हैदराबादने गोव्यावर ३७ धावांनी विजय मिळविला. अर्जुन तेंडुलकरची प्रभावी गोलंदाजी (१० धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स) व्यर्थ ठरली.

विजयासाठी १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोव्याचा संघ १८.५ षटकांत १४० धावांत गारद झाला. रवी तेजाने २० धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्स मिळविले.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या तिसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने प्रतीक रेड्डीला प्रभुदेसाईच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या अर्जुनने प्रभावी गोलंदाजी करत आणखी तीन फलंदाज बाद केले. अवघ्या १० धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. अर्जुनने स्लॉग ओव्हर्समध्ये दोन विकेट्स घेतल्या. अर्जुनने तिलक वर्मा, प्रतीक रेड्डी, बुद्धी राहुल आणि टी. रवी तेजा यांना बाद केले. अर्जुनने आपल्या स्पेलमधील १७ चेंडू निर्धाव टाकले. आपल्या स्पेलमधील एक षटक त्याने निर्धाव देखील टाकले. ४६ चेंडूंत ६२ धावा करणाऱ्या तिलक वर्मालाही त्याने पायचीत पकडले. तिलक वर्मा हा अर्जुनचा मुंबई इंडियन्समधील सहकारी आहे. तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. हैदराबादने २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. यात कर्णधार तन्मय अगरवालनेही मोठा वाटा उचलला. त्याने ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण