क्रीडा

जागतिक क्रमवारीत यशस्वी १२व्या स्थानी, ध्रूव जुरेलचीही आगेकूच

भारताचा २२ वर्षीय डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने बुधवारी आयसीसीच्या जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत...

Swapnil S

दुबई : भारताचा २२ वर्षीय डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने बुधवारी आयसीसीच्या जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत आणखी तीन स्थानांनी आगेकूच करताना १२वा क्रमांक पटकावला. त्याशिवाय २३ वर्षीय ध्रुव जुरेलनेसुद्धा ६९वे स्थान काबिज केले.

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत २ द्विशतके साकारली आहेत. मालिकेपूर्वी तो ६९व्या स्थानी होता. मग त्याने थेट १५वा क्रमांक पटकावला होता. आता पुन्हा एकदा यशस्वीने आगेकूच करून ७२७ गुणांसह १२वे स्थान मिळवले. तर चौथ्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या जुरेलने १००वरून ६९वा क्रमांक मिळवला. फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा विराट कोहली नवव्या स्थानी आहे, तर रोहित शर्माची १३व्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडच्या जो रूटने तिसरा क्रमांक पटकावला आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा ८६७ गुणांसह अग्रस्थानी कायम आहे. तर रविचंद्रन अश्विन ८४६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा रवींद्र जडेजा या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार