File Photo
File Photo ANI
क्रीडा

भारतीय संघाचा सरावादरम्यानचा व्हिडिओ समोर.. 'या' युवा खेळाडूंना मिळणार संधी

वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी (T-20) टीम इंडियाने (Team India) तयारी सुरू केली आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्लीत होणार असून, या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलकडे (KL Rahul) संघाची धुरा असणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिकचे (Dinesh Kartik) संघात पुनरागमन झाले असून, दुसरीकडे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना प्रथमच संधी मिळाली. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवड समितीने युवा खेळाडूंना संधी दिली.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या तयारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंशी बोलताना दिसत आहेत. आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर केएल राहुलला येथेही चांगला खेळ दाखवायचा आहे. त्याने 2 शतकांच्या मदतीने 600 हून अधिक धावा केल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले, एवढेच नाही तर त्याने सुमारे 500 धावा केल्या आणि शानदार गोलंदाजीही केली. अशा स्थितीत या मालिकेतही हा फॉर्म कायम ठेवणे त्याच्यासाठी महत्वाचे असेल.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण