क्रीडा

हा विक्रम करणारा जयस्वाल ठरला चौथा फलंदाज

तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले

वृत्तसंस्था

मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामन्यामध्ये  युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करून सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडले. जयस्वालने यूपी विरुद्ध उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत शतक झळकावले.

रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन डावात शतक झळकावणारा जयस्वाल आता मुंबईचा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि वसीम जाफर या मान्यवरांच्या यादीत तो सामील झाला आहे. रणजी करंडक उपांत्य फेरीच्या तिसऱ्या दिवशी मुंबईने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईसाठी दुसऱ्या डावात अरमान जाफर ने देखील शानदार शतक केले. जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत