क्रीडा

कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा :भारताच्या कनिष्ठांची पदक लयलूट

महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात इशा टाकसाळेने सुवर्णपदकाचा वेध साधला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय पुरुषांनी मंगळवारी कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिहेरी पदकांची कमाई केली. त्याशिवाय महिलांनीही सुवर्ण व कांस्यपदकाचा वेध साधला.

स्पेनमध्ये सुरू असलेल्या या विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर रायफल प्रकारात उमामहेश मॅडिनेनीने सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने २५२.१ गुण कमावले. भारताच्याच पार्थ माने व अजय मलिक यांनी या प्रकारात रौप्य व कांस्यपदकाला गवसणी घातली. महिलांच्या १० मीटर रायफल प्रकारात इशा टाकसाळेने सुवर्णपदकाचा वेध साधला. शांभवी क्षीरसागरने कांस्यपदक प्राप्त केले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप