क्रीडा

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा; बँक ऑफ बडोदा, हिंदुजा, शिवशक्तीची विजयी सलामी, राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा

Swapnil S

मुंबई : राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी साखळी सामन्यांमध्ये बँक ऑफ बडोदा, पी. डी. हिंदुजा, स्नेहविकास, शिवशक्ती या संघांनी विजयी सलामी दिली.

पुरुष शहर विभागात पी. डी. हिंदुजा वि. रुद्रा असोसिएट्स यांच्यात चुरशीची लढत झाली. हिंदुजाने रुद्रावर ८ गुणांनी मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. हिंदुजाच्या प्रथमेश वेके, निखिल पाटील यांनी खोलवर चढाया करत हा विजय खेचून आणला. बँक ऑफ बडोदा वि. माटुंगा वर्कशॉप यांच्यातील लढत बँकेने १२ गुणांच्या फरकासह जिंकली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात बँक ऑफ बडोदाच्या ऋतिक पाटीलच्या चढाया आणि नितीन पाटीलच्या पकडी लक्षवेधी ठरल्या. या सामन्यात माटुंगा वर्कशॉपच्या हर्षद जळगावकरने केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. महिला शहर बाद फेरीच्या सामन्यात, स्नेह विकास वि. जिजामाता यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. सुरुवातीच्या काही मिनिटात जिजामाताने स्नेहविकासवर गुणांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. त्यावर स्नेहविकासच्या सोनाली पाटीलने केलेली आक्रमक चढाई व प्राची तानवडेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे जिजामाताला ७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. धुळ्याच्या शिवशक्ती वि. कणकवलीच्या जय महाराष्ट्र यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा ठरला. शिवशक्तीने शेवटच्या काही मिनिटात जय महाराष्ट्रच्या कोमल रणसिंगला बाद करत सामना फिरवला व ३ गुणांच्या फरकाने विजयश्री खेचून घेतली. शिवशक्तीच्या विद्या डोलताडेने केलेली उत्कृष्ट चढाई व पूजा कदमची पकड या सामन्यात निर्णायक ठरली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त