क्रीडा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची वार्षिक कार्यक्रमपत्रिका जाहीर

पंच मार्गदर्शन शिबीर, खेळाडू प्रशिक्षण शिबीर, स्नेह संमेलन, वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन व दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन असा भरगच्च कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी ७०व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एका विशेष कॅरम स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेचे पुरुष गटाचे पहिले पारितोषिक ७० हजार रुपयांचे असणार आहे.

पंच मार्गदर्शन शिबीर, खेळाडू प्रशिक्षण शिबीर, स्नेह संमेलन, वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन व दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन असा भरगच्च कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. २०२४-२५ या कार्यकालाकरिता महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या सर्व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुरको नॅचरल राऊंड फ्रेमचे कॅरम व सिसका लिजंड स्पेशल एडिशन सोंगट्या वापरण्यात येणार आहेत. शिवाय २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय संघास देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा व खेळाडूंच्या कामगिरीनुसार देण्यात येणाऱ्या रोख पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करण्यात येणार आहे.

मे २०२४ ते एप्रिल २०२५ मधील कॅरम स्पर्धा

  • ४ ते ६ मे : क्षात्रैक्य युनियन क्लब आयोजित कॅरम स्पर्धा, दादर.

  • २५ ते २७ मे : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन कॅरम स्पर्धा, बोरिवली.

  • ११ ते १२ मे : एल. जे. ट्रेनिंग सेंटर, दादर, मुंबई येथे पंच मार्गदर्शन शिबीर.

  • ८ ते १० जून : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट कॅरम स्पर्धा, नरसोबावाडी.

  • २० ते २२ जुलै : चेंबूर जिमखाना कॅरम स्पर्धा, चेंबूर.

  • ऑगस्ट २०२४ : वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, रत्नागिरी.

  • ऑगस्ट २०२४ : स्नेहसंमेलन व विशेष राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा, मुंबई.

  • सप्टेंबर २०२४ : कै. विनायक निम्हण कॅरम स्पर्धा, पुणे.

  • ऑक्टोबर २०२४ : एमआयजी क्रिकेट क्लब कॅरम स्पर्धा, मुंबई.

  • नोव्हेंबर २०२४ : राज्य मानांकन कॅरम स्पर्धा, सिंधुदुर्ग.

  • डिसेंबर २०२४ : महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी (दुसरे पर्व).

  • डिसेंबर २०२४ : उपकनिष्ठ व कनिष्ठ खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर.

  • डिसेंबर २०२४ : उपकनिष्ठ व कनिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

  • जानेवारी २०२५ : घाटकोपर जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा.

  • फेब्रुवारी २०२५ : शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धा.

  • मार्च २०२५ : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर कॅरम स्पर्धा, विलेपार्ले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video