क्रीडा

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराजचे शतक

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत-ए संघाची सुरुवात चांगली झाली नाही

वृत्तसंस्था

बंगळुरूमध्ये न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाड चांगलाच फॉर्ममध्ये आहे. गायकवाडनं तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलंय. ऋतुराजचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक आहे. विशेष म्हणजे या ऋतुराजने न्यूझीलंडला पुणेरी दणका दिलाय.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत-ए संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार प्रियांक पांचालची विकेट लवकर गमावली. पांचाळ ५४ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर अभिमन्यू इसवरनही ३८ धावांवर बाद झाला. मात्र, गायकवाड क्रीजवर राहिला. तुफानी शैलीत फलंदाजी करताना त्याने १२ चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. न्यूझीलंड अ विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी अनिर्णीत राहिल्या आहे. यावेळी भारत अ संघ शेवटचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत