@ANI
क्रीडा

World Boxing Championship : भारतीय महिला बॉक्सरची धमाकेदार कामगिरी; निखत जरीनचीही सुवर्ण कामगिरी

भारतीय बॉक्सर निखत जरीनने व्हिएतनामच्या खेळाडूचा एकहाती पराभव करत महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Boxing Championship) सुवर्णपदक जिंकले

प्रतिनिधी

काल (शनिवारी) महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत (World Boxing Championship) भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा आणि नीतू घंघास यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर आज महिला बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी तामचा ५ - ० असा दारुण पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. विशेष म्हणाले निखतने गेल्या वर्षीही मी महिन्यात याच स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

स्वीटी बुरा आणि नीतू घंघास यांनी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर आज सर्वांचे लक्ष निखत जरीनच्या सामन्याकडे होते. अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करत न्यूगेन थी तामचा पराभव केला. यापूर्वी शनिवारी ४८ किलो वजनी गटात नीतू घंघासने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर ८१ किलो वजनी गटामध्ये स्वीटी बुराने देशासाठी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय