All India Radio News/X 
क्रीडा

राष्ट्रपतींकडून पदकविजेत्यांचे कौतुक

भारताच्या राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्यांसह तमाम पथकाची भेट घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्यांसह तमाम पथकाची भेट घेतली. नवी दिल्ली येथील गणतंत्र मंडप, राष्ट्रपती भवन येथे भारतीय खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र कुस्तीपटू विनेश फोगट व भालाफेकपटू नीरज चोप्रा यावेळी अनुपस्थित होते.

नुकताच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. विनेशच्या पदकाबाबत अद्याप न्यायालयीन लढाई सुरू आहे, तर नीरज दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जर्मनीला दाखल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषासुद्धा उपस्थित होत्या. आता गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सर्व खेळाडूंची भेट घेणार आहे, असे समजते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी