क्रीडा

राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे, आकांक्षा कदम यांनी विजेतेपद पटकाविले

तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत आगामी विश्व अजिंक्यपदासाठी निवड झालेल्या काजल कुमारी व निलम घोडके यांच्यात झाली

वृत्तसंस्था

विरारमधील जुने विवा कॉलेज येथे झालेल्या कै. भास्कर वामन ठाकूर स्मृती ५६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष गटात विश्वविजेत्या प्रथम मानांकित प्रशांत मोरेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सिद्धांत वाडवलकरचा १९-१५, २३-१० असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. महिलांमध्ये अंतिम फेरीत फार्मात असलेल्या व प्रथम मानांकन मिळविलेल्या रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्याच ऐशा साजिद खानवर २५-१२ व २०-१४ असा एकतर्फी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत आगामी विश्व अजिंक्यपदासाठी निवड झालेल्या काजल कुमारी व निलम घोडके यांच्यात झाली. या लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्या राष्ट्रीय विजेत्या काजल कुमारीला डोके वर काढू दिले नाही. तिने काजलवर २२-१८ व २५-१२ असा सरळ विजय मिळविला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षाने मुंबईच्या निलम घोडकेला २५-१०, २२-१४ असे तर ऐशाने मुंबईच्या काजलला १८-१६, २५-२१ असे पराभूत केले होते. पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या फय्याज शेखने बाजी मारली. त्याने मुंबईच्या संदेश अडसूळवर २५-१७, २४-४ असा सहज विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर महिला वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या शोभा कामतने मुंबई उपनगरच्या न्यांसी सिक्वेराचा २३-५, २४-११ असा सहज पराभव करत बाजी

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस