क्रीडा

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : रेयाल माद्रिद, पॅरिस सेंट-जर्मेन उपांत्य फेरीत

रेयालने पहिल्या टप्प्यातील उपांत्यपूर्व लढतील सिटीला ३-३ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात दोघांमध्ये निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिली.

Swapnil S

मँचेस्टर : रेयाल माद्रिद आणि पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) या संघांनी गुरुवारी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. रेयालने उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मँचेस्टर सिटीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात केली, तर पीएसजीने बार्सिलोनाचा ४-१ असा धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत रेयालसमोर बायर्न म्युनिकचे, तर पीएसजीसमोर बोरुशिया डॉर्टमंडचे आव्हान असेल.

रेयालने पहिल्या टप्प्यातील उपांत्यपूर्व लढतील सिटीला ३-३ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात दोघांमध्ये निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिली. मात्र शूटआऊटमध्ये रेयालने बाजी मारून सिटीला त्यांच्याच मैदानात नमवण्याचा पराक्रम केला. रेयालने तब्बल १७व्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दुसरीकडे किलियान एम्बापेने ६१ व ८९व्या मिनिटाला केलेल्या दोन गोलमुळे पीएसजीने बार्सिलोनाला ४-१ अशी धूळ चारली. उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बार्सिलोनाने ३-२ अशी सरशी साधली होती. मात्र एकूण ६-४ अशा गोलफरकासह पीएसजीने आगेकूच केली. बायर्ननने आर्सेनल, तर डॉर्टमंडने ॲटलेटिको माद्रिदला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. १-२ मे रोजी उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील, तर ८-९ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य सामने रंगतील.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट