क्रीडा

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बांगलादेशच्या 'या' प्रमुख फलंदाजाची निवृत्ती

एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केल्यानंतर या अनुभवी फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला

वृत्तसंस्था

बांगलादेशचा प्रमुख फलंदाज तमिम इक्बालने रविवारी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अवघ्या ३३व्या वर्षी तमिमने हा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बांगलादेशने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केल्यानंतर या अनुभवी फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला.

तमिमने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिले की, आजपासून मला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त समजा. तुम्हा सर्वांचे आभार. मी आजपासून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. तुमचे सर्वांचे आभार.

हा धडाकेबाज फलंदाज फॉर्मात असतानाच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी समोर आली.

तमिमने ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४.०८च्या सरासरीने आणि ११६.९६ च्या स्ट्राइक रेटने १५७८ धावा केल्या. त्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकाविणारा तमिम हा एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात ओमानविरुद्ध भारतीय भूमीवर हे शतक झळकावले होते. तमिम इक्बाल हा बांगलादेशचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

तमिमने सप्टेंबर २००७ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने केवळ टी-२० आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशचा प्रमुख फलंदाज म्हणून जबाबदारी वाहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करण्यापासून तो केवळ ५७ धावा दूर आहे. असे करणारा तो पहिला बांगलादेशी फलंदाज ठरेल.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार