क्रीडा

होतकरू मुलांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी रिंकू सिंगचा पुढाकार

अलिगढमधील महुआ खेडा स्टेडियममध्ये शंभर उदयोन्मुख खेळाडूंसाठी वसतिगृह

वृत्तसंस्था

आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईटरायर्डसला (केकेआर) गुजरात टायटन्सवर ५ चेंडूत ५ षटकार ठोकून विजय मिळवून देणारा अलिगढच्या रिंकू सिंगने गरीब मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी अलिगढमधील महुआ खेडा स्टेडियममध्ये वसतिगृह बांधण्याचा संकल्प केला आहे. हे वसतिगृह लवकरच तयार होणार असून गरिबीमुळे मागे राहिलेल्या प्रतिभावान मुलांना या वसतिगृहात राहण्यासोबतच क्रिकेटचे प्रशिक्षणही मिळावे, हा रिंकू सिंगचा उद्देश आहे.

रिंकू सिंगचा मोठा भाऊ मुकुल सिंग यांनी माहिती दिली की, ‘‘या वसतिगृहात सुमारे १०० होतकरू खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना क्रिकेटमध्ये भवितव्य घडवायचे आहे; अशा गरीब मुलांसाठी रिंकू सिंग वसतिगृह बांधत आहे. या गरीब मुलांना स्वत: रिंकू सिंग प्रशिक्षण देणार आहे. सुमारे एक ते दीड महिन्यात या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. माझ्या भावाने गरिबीत दिवस काढल्याने त्याला ही कल्पना सुचली आहे.’’

मुकुल सिंग म्हणाले की,‘‘ गरीब मुलांच्या वेदना रिंकू समजू शकतो. त्याला गरीब मुलांना प्रशिक्षण देऊन क्रिकेट जगतात चमकवायचे आहे. वसतिगृहातील मुलांना प्रशिक्षणासोबतच सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. आता गरिबी कोणत्याही होतकरू मुलाचा मार्ग रोखणार नाही. अलिगढ येथील रिंकूचे बालपणीचे प्रशिक्षक मसुदज-जफर अमिनी म्हणाले की, “रिंकूला नेहमीच तरुण खेळाडूंसाठी वसतिगृह बांधायचे होते. ज्यांच्याकडे स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक संसाधने नाहीत, त्यांच्यासाठी झटण्याचा रिंकूचा मानस आहे. रिंकू आता आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्याने आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. प्रशिक्षक पुढे म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी रिंकूने त्याच्या संघात सामील होण्यापूर्वी प्रगतीकडे बारकाईने लक्ष ठेवून वसतिगृहाचे काम सुरू केले.

प्रशिक्षणार्थीसाठी जेवणाची सोय

प्रशिक्षणार्थीसाठी वसतिगृहात १४ खोल्या असतील आणि प्रत्येकामध्ये चार प्रशिक्षणार्थी राहू शकतील. शेड आणि मंडपही बांधला जात आहे. स्वतंत्र स्वच्छतागृहे असणार आहेत. त्या ठिकाणी चालविल्या जाणाऱ्या कॅन्टीनमध्ये जेवणाची सोय असणार आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार असून संपूर्ण खर्च रिंकू करणार आहे.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार