क्रीडा

Rishabh Pant : ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल; 'या' रुग्णालयात होणार उपचार

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या गाडीचा झाला होता भीषण अपघात, डेहराडूनमधून मुंबईत दाखल

प्रतिनिधी

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा ३० डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. दिल्लीमधून आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. सुदैवाने, त्याला जास्त दुखापत झालेली नसून थोडक्यात बचावला होता. त्याच्यावर आत्तापर्यंत डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आता लिगामेंट सर्जरीसाठी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत उपचार होणार आहे. बीसीसीआयने परिपत्रक काढत यासंदर्भातील माहिती दिली.

दिल्लीहून आपल्या घरी जात असताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला. गाडी चालवताना त्याला डुलकी लागल्याने ती सरळ दुभाजकावर आदळली. सुदैवाने, ऋषभ यातून बचावला असून गाडीला आग लागून ती बेचिराख झाली होती. मात्र, अपघातामुळे ऋषभला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये आणले आहे. दरम्यान, ऋषभ पंत यातून लवकरच सावरून पुन्हा एकदा मैदानात पूर्वीसारखाच तुफानी खेळेल, अशी प्रार्थना क्रिकेटचे चाहते करत आहे. यावर्षी विश्वकपदेखील होणार आहे, त्यामुळे तो लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना सर्वच भारतीय करत आहेत.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर