क्रीडा

सौरव गांगुली हे पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेरच्या क्षणी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, मावळते अध्यक्ष सौरव गांगुली हे पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत.

गांगुली यांनी मुंबईत मंगळवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीला येण्यापूर्वी गेल्या आठवड्यात बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या. गांगुलीला आयपीएलच्या चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती; मात्र गांगुलीने ती नाकारली.

बीसीसीआयचे सर्वोच्च पद भूषवल्यानंतर त्याच बीसीसीआयच्या एका उप समितीचे अध्यक्षपद भूषविणे गांगुली यांना मान्य नसल्याचे कळते. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, गांगुली यांना बीसीसीआय अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्याचा प्रघात पाडता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?