क्रीडा

सर्फराझला उत्तर प्रदेशला पाठवण्याचा निर्णय चुकीचा-वडील नौशाद खान

२४ वर्षीय सर्फराझने काही वर्षांपूर्वी रणजीच्या तीन हंगामांतील अवघ्या आठ सामन्यांत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले

ऋषिकेश बामणे

सर्फराझला उत्तर प्रदेशला पाठवण्याचा निर्णय चुकला. सध्या तो कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत असून लवकरच त्याला भारतीय संघात स्थान मिळेल, अशी आशा आहे. त्याला भारताच्या कसोटी संघाकडून खेळताना पाहण्याचे माझे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया सर्फराझचे वडील नौशाद खान यांनी व्यक्त केली.

२४ वर्षीय सर्फराझने काही वर्षांपूर्वी रणजीच्या तीन हंगामांतील अवघ्या आठ सामन्यांत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र सर्फराझ पुन्हा मुंबईत परतला आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. सध्या कामगिरीतील सातत्यामुळे त्याने निवड समितीचे दार ठोठावले आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. “सर्फराझला उत्तर प्रदेशला पाठवण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. गेल्या दोन हंगामांपासून त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. परंतु आजही मी त्याला निकालाकडे लक्ष न देण्याचे सुचवतो. भारतीय संघात त्याला स्थान एक दिवशी नक्कीच मिळेल. सर्फराझला भारताच्या कसोटी गणवेशात खेळताना पाहायला नक्कीच आवडेल,” असे नौशाद म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक