s_badrinath/Instagram)
क्रीडा

शरीरावर टॅटू असणाऱ्यांना भारतीय संघात प्राधान्य! माजी क्रिकेटपटू बद्रीनाथचा निवड समितीवर निशाणा

भारतीय संघात निवड होण्यासाठी तुमच्या शरीरावर टॅटू असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीशी प्रेमसंबंधात असाल, तर तुमची निवड अधिक लवकर होऊ शकते, अशी खोचक टीका भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथने केली आहे.

Swapnil S

चेन्नई : भारतीय संघात निवड होण्यासाठी तुमच्या शरीरावर टॅटू असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीशी प्रेमसंबंधात असाल, तर तुमची निवड अधिक लवकर होऊ शकते, अशी खोचक टीका भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथने केली आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात २७ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान न लाभल्याने ४३ वर्षीय ब्रदीनाथने संताप व्यक्त केला आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ प्रथमच एखादी मालिका खेळणार आहे. मात्र ऋतुराजने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत छाप पाडूनही त्याला संधी लाभलेली नाही. तर रियान पराग, शुभमन गिल खेळाडू संघात आहेत. त्याशिवाय टॅटू असणारे म्हणजेच सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, के. एल. राहुल असे खेळाडू भारतीय संघात असल्याने बद्रीनाथने एकप्रकारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“जेव्हा रिंकू सिंग, ऋतुराज यांसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नाही. तेव्हा असे वाटते की भारतीय संघात निवड होण्यासाठी तुम्ही शरीरावर टॅटू काढणे गरजेचे आहे. तसेच तुमची प्रतिमा काहीशी मलिन असली तरी चालेल. मात्र तुमच्याकडे चांगला पीआर मॅनेजर असायला हवा. तसेच एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीशी तुम्ही प्रेमसंबंधात असाल, तर अधिकच प्राधान्य दिले जाते,” असे क्रिक डिबेट विथ बद्री या यूट्यूब कार्यक्रमात बद्रीनाथ म्हणाला. ऋतुराजला श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान लाभलेले नाही. तर रिंकू हा फक्त टी-२० मालिकेचा भाग आहे.

सूर्यकुमारला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र तो तसेच हार्दिक एकदिवसीय संघाचा भाग नाही. श्रेयस अय्यर, राहुल एकदिवसीय संघात परतले आहेत. त्यामुळे काही खेळाडूंना निवड समिती न विचारताच थेट १-२ प्रकारांसाठी मर्यादित ठेवत आहे का, असेही बद्रीनाथने विचारले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी