क्रीडा

मुंबईला बोल्टचा झटका!

Swapnil S

मुंबई : ट्रेंट बोल्टने (२२ धावांत ३ बळी) केलेल्या भेदक गोलंदाजीचा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला झटका बसला. त्यामुळे आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईला २० षटकांत ९ बाद १२५ धावांत रोखले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना बोल्ट व लेगस्पिनर युझवेंद्र चहलच्या (११ धावांत ३ बळी) गोलंदाजीपुढे मुंबईची अक्षरशः भंबेरी उडाली. विशेषतः बोल्टने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व नमन धीर यांना शून्यावरच तंबूत धाडले. रोहित आयपीएल कारकीर्दीत १७ व्यांदा शून्यावर बाद झाला. त्याशिवाय डेवाल्ड ब्रेविसला भोपळाही फोडता आला नाही.

वांद्रे बर्गरने इशान किशनचा (१६) अडसर दूर करून मुंबईची ४ बाद २० अशी अवस्था केली. तेथून कर्णधार हार्दिक पंड्या व तिलक वर्मा यांनी मुंबईला काहीसे सावरले. पंड्या व तिलकने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. चहलने हार्दिकला जाळ्यात अडकवले. ६ चौकारांसह त्याने २१ चेंडूंत ३४ धावा केल्या. चहलनेच तिल्लारी ३२ धावांवर बाद करून मुंबईच्या आशांना सुरुंग लावला. टिम डेव्हिडने अखेरीस १७ धावा करून मुंबईला किमान तीन आकडी धावसंख्या गाठून दिली. राजस्थानसाठी बोल्ट व चहलने तीन, बर्गरने दोन, तर आवेश खानने एक बळी मिळवला.

हार्दिक पुन्हा ट्रोल आणि प्रशंसाही

नाणेफेकीच्या वेळीस काही चाहत्यांनी हार्दिक मैदानावर येताच 'बू' असा आवाज केला. त्याशिवाय रोहित रोहितच्या घोषणाही दिल्या. मात्र हार्दिकला फलंदाजीदरम्यान चाहत्यांनी तितकाच उत्तम प्रतिसादही दिला. तसेच त्याच्या चौकारांवर टाळ्यांचा कडकडाट केला.

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?