विराट कोहलीची २०२७ नंतर निवृत्ती? 
क्रीडा

विराट कोहलीची २०२७ नंतर निवृत्ती?

भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली याने पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक हा आपल्या कारकीर्दीतील शेवटचा असेल, अशी घोषणा केली आहे.

Swapnil S

थिरुवनंतपुरम : भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली याने पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक हा आपल्या कारकीर्दीतील शेवटचा असेल, अशी घोषणा केली आहे. कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेला कोहली फक्त वनडे क्रिकेटमध्येच भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये तो खेळताना दिसतो.

वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याने निवृत्तीचे संकेत दिले. आगामी विश्वचषक स्पर्धा संयुक्तपणे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होणार आहे. 'भारतासाठी मी खेळणारा हा शेवटचा वर्ल्डकप असेल. मैदानात संपूर्ण ताकद पणाला लावून देशाला विश्वचषक जिंकून देणे हेच माझे अंतिम ध्येय असेल,' असे कोहलीने सांगितले. यापूर्वी २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात कोहलीचा समावेश होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

२६५ तालुक्यांत दुष्काळ; ७४ टक्के राज्य दुष्काळाच्या छायेत; कर्जवसुलीला स्थगिती, परीक्षा शुल्क माफ, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

इंडिया आघाडीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक

निवडणूक आयोगाचा सारवासारवीचा प्रयत्न; SIR चे सर्व निर्णय सर्वानुमते

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष