क्रीडा

विजयपथावर परतण्याचे विराटच्या बंगळुरूपुढे आव्हान; घरच्या प्रेक्षकांसमोर आज झुंजार लखनऊ सुपर जायंट्सशी सामना

फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या बंगळुरूला सलामीच्या सामन्यात चेन्नईने नमवले. त्यानंतर विराटच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने पंजाबला धूळ चारली. मात्र कोलकाताविरुद्ध चिन्नास्वामीवरच झालेल्या सामन्यात विराटच्या अर्धशतकानंतरही बंगळुरूचा दारुण पराभव झाला.

Swapnil S

बंगळुरू : तारांकित खेळाडूंचा भरणा असूनही अद्याप एकदाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या हंगामातसुद्धा तीनपैकी दोन लढती गमावल्याने बंगळुरूवर दडपण असून अनुभवी विराट कोहलीच संघासाठी सातत्याने धावून येत आहे. त्यामुळे मंगळवारी घरच्या प्रेक्षकांसमोर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर झुंजार वृत्तीच्या लखनऊ सुपर जायंट्सला नमवून विजयपथावर परतण्यासाठी विराटचा बंगळुरू संघ उत्सुक आहे.

फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या बंगळुरूला सलामीच्या सामन्यात चेन्नईने नमवले. त्यानंतर विराटच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने पंजाबला धूळ चारली. मात्र कोलकाताविरुद्ध चिन्नास्वामीवरच झालेल्या सामन्यात विराटच्या अर्धशतकानंतरही बंगळुरूचा दारुण पराभव झाला. गोलंदाजांचे अपयश बंगळुरूला सातत्याने महागात पडत आहे. तसेच बंगळुरू हा यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात पराभव पत्करणारा आतापर्यंतचा एकमेव संघ आहे. त्यांचा नेट रनरेटही (धावगती) खालावलेला आहे. त्यामुळे बंगळुरूला कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे के. एल. राहुलच्या लखनऊने सुरुवातीला राजस्थानकडून पराभव पत्करला. मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबला २१ धावांनी नमवले. गेल्या दोन हंगामांमध्ये बाद फेरी गाठणाऱ्या लखनऊने २०२३मध्ये बंगळुरूला अखेरच्या चेंडूवर नमवले होते. त्याशिवाय या संघातील काही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे चाहत्यांना या संघांमधील लढत पाहण्यास मजा येईल. चिन्नास्वामी येथे धावांचा पाठलाग करणे सोपे असून दवाचा घटक निर्णायक ठरत असल्याने १८० धावाही पुरेशा ठरणार नाहीत.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव