ICC
क्रीडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वॉर्नर निवृत्त

१५ वर्षे ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला यंदाच्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यावर निवृत्तीचा निर्णय घेतला.

Swapnil S

किंग्जटाऊन : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. १५ वर्षे ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला यंदाच्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यावर निवृत्तीचा निर्णय घेतला.

३७ वर्षीय वॉर्नरने जानेवारी महिन्यात कसोटीतून निवृत्ती पत्करली होती. तसेच गतवर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या प्रकारातूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. फक्त टी-२०मध्ये तो ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत होता. वॉर्नरने या विश्वचषकात ७ सामन्यांत २ अर्धशतकांसह १७८ धावा केल्या. भारताच्या अर्शदीप सिंगने सोमवारी वॉर्नरला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वॉर्नरने निवृत्ती घेतली. जानेवारी २००९मध्ये वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी पहिला टी-२० सामना खेळला होता.

वॉर्नरने टी-२० प्रकारात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ३,२७७ धावा केल्या. ११० टी-२० सामन्यांत त्याने १ शतक व २८ अर्धशतके झळकावली. २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक उंचावला, त्यावेळी वॉर्नरलाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त वॉर्नरने ११२ कसोटींमध्ये ८,७८६ धावा तसेच १६१ एकदिवसीय लढतींमध्ये ६.९३२ धावा केल्या. कसोटीत वॉर्नरने २६, तर एकदिवसीयमध्ये २२ शतके झळकावली. २०१८मध्ये वॉर्नरला एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याने झोकात पुनरागमन केले. आयपीएलमध्ये मात्र वॉर्नर खेळत राहणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक