क्रीडा

मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये पोहचवणारा आकाश मधवाल नक्की आहे तरी कोण?

चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने 3.3 षटकात अवघ्या 5 धावा देत 5 बळी घेऊन मुंबईला क्वालिफायर-2 मध्ये पोहचवले आहे

नवशक्ती Web Desk

सध्या आकाश मधवाल या खेळाडूचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. आकाश हा आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स सामन्याच्या विजयाचा शिल्पकार मानला जात आहे. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित करुन सोडले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने 3.3 षटकात अवघ्या 5 धावा देत 5 बळी घेऊन मुंबईला क्वालिफायर-2 मध्ये पोहचवले आहे. सध्या आकाश मधवाल बाबत चर्चा सुरु आहेत. त्याच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आकाश मधवाल हा ऋषभ पंतचा शेजारी असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. आकाशने अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण करुन क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने दिल्लीला जाण्यापुर्वी ऋषभ पंतला प्रशिक्षण देणाऱ्या अवतार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळले आहे. आकाश मधवालने 2013 मध्ये एका दुर्घटनेत आपले वडील गमाले आहेत.

उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक मनीष झा यांनी आकाशबद्दल बोलताना सांगितले की, "आकाश 2019 मध्ये चाचणीसाठी आला तेव्हा आम्ही प्रभावीत झालो होतो. वसिम जाफर यांनी त्याला आपल्या सोबत घेऊन सरळ कर्नाटक विरुद्ध असलेल्या सय्यद मुश्ताक अली सामन्यात संधी दिली. कोविडच्या काळात रणजी करंडक रद्द झाला आणि मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली. तेव्हा मी त्याला तिन्ही फॉरमॅटमध्य तो खेळेल, त्याला सर्व सामने खेळण्याची संधी मिळेल, असे आश्वासन दिले होते." असे त्यांनी सांगितले.

अवतार आकाश मधवाल कशाप्रकारे रोहित शर्माचा आवडता गोलंदाज बनला याबाबत सांगतात की, "तो त्याच्या गोलंदाजीवर प्रेम करत होता. पण अचुकता कमी होती. तुम्हाला वेगवान आणि सरळ गोलंदाजी करता येते तर तुम्ही हळू गोलंदाजी का करत आहात. त्यानंतर त्याने हळू-हळू स्व:तावर नियंत्रण मिळवले." तसेच गेल्यावर्षी सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर गेला त्यावेळी आकाश हा संघात सामील झाला होता. आता तो रोहित शर्माचा आवडता गोलंदाज बनला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त