क्रीडा

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग २०२३ ; मुंबई इंडियन्स ठरली पहिल्या पर्वाची विजेती

कर्णधार हरनप्रीत कौरच्या मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम केला मुंबई इंडियन्सच्या नावावर

प्रतिनिधी

महिला प्रीमियर लीग २०२३चा (WPL 2023) पहिला हंगाम हा मुंबई इंडियन्सने आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करण्यास उतरलेल्या दिल्लीने २० षटकांमध्ये ९ विकेट्सवर १३१ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना मुंबईने १९.३ षटकांमध्ये ३ विकेट्सवर १३४ धावा केल्या. यावेळी नताली सीव्हर ब्रंटने मुंबईकडून खेळताना ५५ चेंडूमध्ये नाबाद ६० धावा करून विजेतेपद मिळवून दिले.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिल्या महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रंगला. यावेळी पहिल्यांदा नाणेफेक जिंकत दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ३५ धावा केल्या. मात्र, इतर कोणत्याही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. यावेळी दिल्लीकडून शिखा पांडेने नाबाद २७ तर राधा यादवनेही नाबाद राहत २७ धावा केल्या. विशेष म्हणजे, दोघीनींही शेवटच्या विकेटसाठी फक्त २४ चेंडूंमध्ये ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. यावेळी इस्सी वँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर, अमेलिया केरने २ विकेट्स घेतल्या.

१३२ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने २२३ धावांमध्ये पहिल्या २ विकेट्स झटपट गमावल्या. सलामीला आलेल्या फलंदाज हिली मॅथ्यूजने १३ आणि यास्तिका भाटियाने ४ धावा केल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने ३९ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच, नताली सीव्हर ब्रंटने ५५ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या. अमेलिया केर ८ चेंडूत १४ धावा केल्या.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस