क्रीडा

मारक्रम-बवुमाच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत; जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना

पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या ऐतिहासिक अशा लॉड्सवर शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयडेन मारक्रम आणि टेम्बा बवुमा यांनी शानदार भागिदारी रचत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात बॅकफुटवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले.

Swapnil S

लंडन : पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या ऐतिहासिक अशा लॉड्सवर शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयडेन मारक्रम आणि टेम्बा बवुमा यांनी शानदार भागिदारी रचत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात बॅकफुटवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दक्षिण आफ्रिकेने १९४ धावांवर २ फलंदाज गमावले होते. विजयासाठी त्यांना ८८ धावांची आवश्यकता होती.

१३८ धावांवर पहिला डाव कोसळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर मोठ्या लक्ष्याचे आव्हान होते. अवघ्या ९ धावांवर दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी फुटली. स्टार्कने कॅरीकरवी झेलबाद करत अवघ्या ६ धावांवर रिकल्टनला माघारी धाडले. त्यानंतर सलामीवीर आयडेन मारक्रम आणि विआन मुल्डर या जोडगोळीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी देखील स्टार्कनेच फोडली. मुल्डरला आपल्या सापळ्यात अडकवत स्टार्कने आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. त्यानंतर मारक्रम आणि कर्णधार टेम्बा बवुमा यांनी मैदानात तळ ठोकला. या दरम्यान मारक्रमने आपले अर्धशतक झळकावले.

स्टार्कचे नाबाद अर्धशतक

कगिसो रबाडा (४ विकेट) आणि लुंगी एनगिडी (३ विकेट) या वेगवान दुकलीने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर रोखला. प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकलेली असताना मिचेल स्टार्कने मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोटला. त्याने १३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ५८ धावांची संघातर्फे या डावातील सर्वाधिक खेळी खेळली. ॲलेक्स कॅरीने ४३ धावा जोडत स्टार्कच्या साथीने डगमगलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन