ठाणे

वसई-विरारमध्ये महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत; १ जूनपासून महापालिकेची अंमलबजावणी

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत दिली जात असून, एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महापालिकांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत मिळत नव्हती.

Swapnil S

वसई : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत दिली जात असून, एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महापालिकांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत मिळत नव्हती. या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत वसई विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महिलांसाठी बस प्रवासात ५०% सवलत मिळावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, शुक्रवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अधिकृत पत्राद्वारे कळविले की, १ जूनपासून वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना बस प्रवासाच्या तिकिटात ५०% सवलत देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे वसई-विरारमधील हजारो महिला प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार असून, या यशस्वी पाठपुराव्याबद्दल परिसरातील महिलांकडून वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

इराण युद्धामुळे ही व्यक्ती बनली अब्जाधीश

आजचे राशिभविष्य, २७ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नारळी पौर्णिमेसाठी गोड मेजवानी; 'हे' पदार्थ नक्की ट्राय करा