ANI
ठाणे

डोंबिवली : निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक न दिल्यामुळे शाळेवर गुन्हा दाखल

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळेतील शिक्षक उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने राष्ट्रीय कर्तव्याच्या पालनात कसूर केल्याचा आरोप या शाळेवर ठेवण्यात आला आहे.

महसूल विभागाचे डोंबिवली एमआयडीसी परिसराचे तलाठी लक्ष्मण नाना शिंदे यांनी याप्रकरणी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या आदेशावरून सिस्टर निवेदिता शाळेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा कालावधी २३ फेब्रुवारी ते ५ सप्टेंबर दरम्यानचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला कर्मचारी वर्ग आवश्यक असतो. ठाणे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा व महाविद्यालयांमधून हा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जातो. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

तहसीलदारांच्या आदेशानुसार स्थानिक मंडळ अधिकारी आणि तलाठी आपल्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना त्यांच्या शिक्षक व अन्य कर्मचारी वर्ग निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना करत असतात. यानुसार, महसूल विभागाने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून डोंबिवली आणि कल्याण परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची मागणी केली होती. इतर शाळांनी कर्मचारी वर्ग निवडणूक आयोगाला दिला, परंतु सिस्टर निवेदिता शाळेच्या प्रशासनाने शिक्षक देण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस