ठाणे

१० लाखांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

काशिमीरा युनिटमध्येच १० लाखांची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या पथकाने पडताळणी करून खात्री केली होती. त्यानुसार बुधवार २७ मार्च रोजी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिस ठाण्यात कैलास टोकलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : अरुणाचल प्रदेश राज्याच्या आरटीओकडे बनावट कागदपत्रांद्वारे वाहनांची नोंदणी करून तिकडून नाहरकत घेऊन वाहनांची नोंदणी वसई प्रादेशिक परिवहन विभागात करून शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ चा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जयवंत टोकले (४१) विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ डिसेंबर २०२३ रोजी विरार पोलीस ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक उज्वल भावसार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण राऊतविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अरुणाचल प्रदेश राज्यातील आरटीओकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची नोंदणी करून त्या कागदपत्रांच्या आधारे वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहने नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्या बद्दल हा गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ काशिमीरा युनिट करत होते. तपासात रामकैलास लालबहादूर यादव रा. भाईंदर पूर्व याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले याने आरोपी यादव याला जामीन मंजूर व्हावा तसेच गुन्ह्यातील कागदपत्रे आरोपीच्या सोयीने बनवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी त्याच्या भावाकडे मागितली होती.

काशिमीरा युनिटमध्येच १० लाखांची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या पथकाने पडताळणी करून खात्री केली होती. त्यानुसार बुधवार २७ मार्च रोजी आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिस ठाण्यात कैलास टोकलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली