ठाणे

भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह पाच जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी

शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात रविवारी ठाण्यातून झाली. गडकरी रंगायतन येथे झालेल्या या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह पाच जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात रविवारी ठाण्यातून करण्यात आली. ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ या अतूट नात्याला गद्दारीचा शिक्का लागला असून स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेच्या तोफा ठाण्यात धडाडल्या. या मेळाव्यात शिवसेना नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाविरोधात टीकेचे बाण सोडले होते. तसेच काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली होती. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व नेत्यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम