ठाणे

समाजसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा

Swapnil S

भाईंंदर : मीरारोडमध्ये एका ३७ वर्षीय समाजसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी सामाजिक संस्थेचेचालक व समाजसेवक गणेश फडकेविरुद्ध नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड परिसरात पीडित फिर्यादी या १८ फेब्रुवारी रोजी साडेआठच्या सुमारास आरोपी तथा समाजसेवक गणेश फडके यांनी पीडितेला हॉटेल मीरामनी, शांतीनगर, मीरारोड पूर्व येथे भेटण्याकरिता बोलावले असता आरोपीने पीडितेच्या जवळ येऊन 'आय लव्ह यू, मला एक पप्पी दे' असे म्हणून पीडितेस जोरात मिठी मारली. त्यामुळे पीडिता व समाजसेविकाच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि त्यानंतर तसेच १३ मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पीडितेने सामाजिक संस्थेत सभासद होण्यासाठी भरलेले दोन हजार रुपये परत मागितले असता आरोपी फडके यांनी मी तुला पैसे देणार, नाही तुला काय करायचे आहे ते कर कुठल्या पोलीस ठाण्यात जायचे आहे, तिथे जा बोलून, तुला बघून घेईन तु माझे काहीही करू शकत नाही. घेतलेले पैसे देणार नाही मी काय चीज आहे, तू मला ओळखत नाही अशी शिवीगाळ व धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदरील गुन्ह्याचा तपास नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एम. खान हे करत आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल