ठाणे

मीरारोडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन महिन्याची गरोदर राहिल्यावर घटना उघडकीस, आरोपीला अटक

मीरारोड भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला धीरज हरिराम पासवान या तरुणाने तू मला आवडते असे सांगून जबरदस्तीने तिला इमारतीच्या बाथरूममध्ये नेले.

Swapnil S

भाईंंदर : मीरारोडच्या हटकेश भागातील एका इमारतीच्या खाली असणाऱ्या बाथरूममध्ये एका अल्पवयीन मुलीवर दोनवेळा अत्याचार केल्याची आणि त्यातून ती गरोदर राहिल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मीरारोड भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला धीरज हरिराम पासवान या तरुणाने तू मला आवडते असे सांगून जबरदस्तीने तिला इमारतीच्या बाथरूममध्ये नेले. तेथेच तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पासवानने तिला बाथरूममध्ये जबरदस्ती नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्याचबरोबर याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली. अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी पासवानविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन