ठाणे

चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेकडील दावडीमधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील दावडीमधील दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रील लावले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता, असा आरोप करत विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी करत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परी छोटूलाल बिंद असे मृत्यू पावलेल्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. छोटूलाल हे पत्नी व दोन मुलीबरोबर नालासोपारा येथे राहतात. छोटूलाल हे आपल्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन डोंबिवलीत राहत असलेल्या भावोजीकडे पूजेकरीता आले होते. घरी पूजा सुरू असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. याचदरम्यान गॅलरीला ग्रील नसल्याने परीचा तोल गेल्याने इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. परी खाली पडल्याचे कळताच परीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

याप्रकरणी परीच्या वडिलांनी इमारतीच्या विकासकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव